पियुषा दगडे पाटील ठरल्या जनतेतून निवडुन आलेल्या पहिल्या महिला सरपंच

नुकताच काही दिवसापूर्वी शासनाकडून एक आदेश काढण्यात आला होता. तो आदेश असा होताकी यापुढे ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये सरपंच हा थेट नागरिकान  मधून निवडला जाईल. या पूर्वी सरपंच हा ग्रामपंचायत सदस्यातून निवडला जाई. मात्र या आदेशा नंतर सर्व बदलून गेले.

आदेश जाहीर झाल्यानंतर पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या पहिल्यांदा निवडणुका झाल्या. सर्वांचे लक्ष कोण असेल जनतेतून निवडून आलेला सरपंच याकडे लागले होते. जनतेतून निवडुन आलेली पुणे जिल्ह्यातील पहिली महिला सरपंच होण्याचा मान भारतीय जनता पक्षाच्या बावधन गावातील पियुषा किरण दगडे पाटील यांना मिळाला. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत पियुषा यांनी 40 मतांची आघाडी घेत आज विजय मिळवला. पियुषा यांना 2300 आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार प्रतिक्षा दगडे यांना 2260 मते मिळाली

1 Comment

Click here to post a comment