पीयूष गोयल यांची पत्रकाराला एक दिवसाचा रेल्वेमंत्री बनण्याची ऑफर

नवी दिल्ली : रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या खात्याच्या चार वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराशी पीयूष गोयल यांची भेट झाली. यावेळी त्या पत्रकाराने पीयूष गोयल यांना रेल्वेतील समस्या व त्यावरील उपाययोजनांसंदर्भातील एक पत्र दिलं.

त्यावर पीयूष गोयला यांनी पत्रक्काराला एक ऑफर दिली. एक दिवस रेल्वे मंत्री बनण्याची ही ऑफर होती. ते म्हणाले की, नायक सिनेमाप्रमाणे तुम्ही माझ्याजागी रेल्वे मंत्री बना आणि स्वतःचे नियम-कायदे लागू करा. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी मस्करीत हे वक्तव्य केलं नाही तर, रेल्वे बोर्डाच्या चेअरमॅनला एक मॉक इव्हेन्ट करायला सांगितला.

दरम्यान, पीयूष गोयल यांनी या पत्रकार परिषदेमध्ये विविध मुद्दयावर मतं मांडली. भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्याचा सरकारचा सध्या विचार नाही व असा विचार भविष्यातही कदापि असणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी दिली.आधुनिकीकरण व नवे तंत्रज्ञान यासाठी रेल्वे खासगी व विदेशी कंपन्यांची मोठ्या प्रमाणावर मदत घेत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या खासगीकरणाची भीती रेल्वे कर्मचारी संघटनांनी व्यक्त केली.