पियुष गोयल यांनी आक्रस्ताळेपणा सोडून राज्याला सहकार्य, रेल्वेवरून थोरातांनी टोचले कान

balasaheb thorat

मुंबई : श्रमिकांना घरी पोहचवण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष श्रमिक रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्राला केवळ 50% रेल्वे गाड्या देत आहे, असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केला. यावरून आता रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यात जुंपली असल्याचं दिसत आहे.

यावर आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी महाराष्ट्राला अपेक्षित ट्रेन रेल्वे मंत्रालय पुरवत नाही. हे सत्य स्वीकारून या मजुरांना मदत करण्याऐवजी रेल्वेमंत्री पियुष गोयल ट्वीटरवरून आक्रस्ताळेपणा करत आहेत हे दुर्देवी आहे. त्यांनी आडमुठी भूमिका सोडून सहकार्य करावे, असे थोरात म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्राला 157 ट्रेनची आवश्यकता आहे, त्यातील 115 मुंबईत अपेक्षित आहेत. यापूर्वी रेल्वे उद्या किती ट्रेन देणार आहे हे कळवायचे आणि आम्ही त्यांना यादी द्यायचो. सध्या ईदचा सण असल्याने अधिकारी कर्मचारी बंदोबस्तात आहेत त्यामुळे पियुष गोयल यांनी थोडे सबुरीने घ्यावे.

दरम्यान महाराष्ट्रात खासकरून मुंबईमध्ये परप्रांतीय मजुरांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तरीदेखील रेल्वे प्रशासन केवळ 50 % गाड्या देत आहे, असे उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधताना म्हणाले होते. यावर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी लगेच ट्विट करत आम्ही 125 गाड्या पाठवण्यास तयार आहोत. तुम्ही केवळ श्रमिकांची संख्या आणि किती गाड्या हव्या आहेत याची माहिती द्यावी. यानंतर पियुष गोयल यांनी सतत ट्विट करत राज्य सरकारला आम्ही रेल्वे पाठवण्यास सक्षम असल्याचं सांगत आले.

रेल्वेमंत्र्यांनी याबाबत 3 ट्विट केले त्यानंतर रात्री 12 वाजता पीयूष गोयल यांनी पुन्हा ट्विट करुन रात्रीचे बारा वाजले आहेत आणि 5 तासांनंतरही आमच्याकडे महाराष्ट्र सरकारकडून उद्याच्या 125 ट्रेनची माहिती आणि प्रवाशांची यादी आली नाही. तरीही मी अधिकाऱ्यांना प्रतिक्षा करा आणि तयारी सुरु ठेवा असा आदेश दिल्याचं त्यांनी सांगितले.

मात्र रात्री 2 वाजता पियुष गोयल यांनी पुन्हा ट्विट करत महाराष्ट्र राज्य सरकारकडून 46 गाड्यांची यादी पाठवली असल्याची माहिती दिली. तर 41 ट्रेन सोडाव्या लागतील कारण उर्वरित ट्रेन पश्चिम बंगाल आणि ओडिसा याठिकाणच्या आहेत. तिथे अम्फान चक्रीवादळामुळे ट्रेन चालवण्यास परवानगी नसल्याचं पियूष गोयल यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

#Corona : परीक्षेसाठी एवढी लुडबूड का ? शिवसेनेने घेतला राज्यपालांचा समाचार

#corona : राज्यात कोरोनाबाधितांनी गाठला 50 हजाराचा आकडा ! 3041 रुग्णांची नव्याने भर 

चीनने दिले प्रत्युत्तर ! अमेरिका जाणूनबुजून चीनला बदनाम करतीये : परराष्ट्र मंत्र्यांनी दिला इशारा