fbpx

२६/११च्या वेळेस विलासरावांना फक्त मुलाच्या करियरची चिंता होती, भाजप नेत्याचा घणाघात

टीम महाराष्ट्र देशा : मुंबईत २६/११चा हल्ला झाला त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख हे केवळ त्यांच्या मुलाला चित्रपटात भूमिका मिळावी, यासाठी चिंतित होते. यासाठीच ते एका निर्मात्याला घेऊन घटनास्थळी आले होते, असा घणाघाती आरोप केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी तत्कालिन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांक यांच्यावर केला आहे. पियुष गोयल यांनी लुधियानामध्ये एका व्यावसायिकांच्या बैठकीत बोलताना हा आरोप केला.

यावेळी बोलताना गोयल म्हणाले, मी सुद्धा मुंबईकर आहे. मुंबईत २६/११ला झालेला दहशतवादी हल्ला तुम्हाला आठवत असेल. त्यावेळचे केंद्रातील काँग्रेस आघाडीचे सरकार कमकुवत होते. त्यामुळे ते काहीच करू शकत नव्हते. त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख एका निर्मात्याला घेऊन हल्ला झालेल्या पंचतारांकित हॉटेलात आले होते. त्यांना केवळ त्यांच्या मुलाला हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका मिळावी, एवढीच चिंता होती.