पीच क्युरेटरमुळे भारताने WTCचा सामना गमावला? समोर आली मोठी माहिती

मुंबई: २०२१ मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीसाठी चेन्नईतील खेळपट्टीचे क्युरेटर हे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्या विरोधात जाणूनबुजून गेले होते, असे काही धक्कादायक मीडिया रिपोर्ट्स समोर आले आहेत. याचा मोठा परिणाम म्हणून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल २०२१ मधून बाहेर पडण्याच्या मार्गावर असताना टीम इंडियाला कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

भारत आणि इंग्लंडमध्ये गेल्या वर्षी चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. ज्यामध्ये चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये प्रत्येकी दोन सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. टीम इंडियाने चार सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली आणि ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल २०२१ साठी पात्र ठरले. तथापि, मालिका सुरू झाली तेव्हा भारताने नियोजन केल्याप्रमाणे काहीही झाले नाही.

एका अहवालात यासंबंधी सांगण्यात आले कि सामन्याच्या एक दिवसाआधी रवी शास्त्री (ravi shastri) आणि अरुण (bharat arun) यांनी पीच क्युरेटरला पीच जशी आहे तशीच ठेवायला सांगितले. त्यावर कोणत्याही स्थितीत पाणी किंवा रोलर चालवण्यास मनाई करण्यात आली होती. संध्याकाळी ते गेल्यानंतर पीच क्युरेटरला बीसीसीआयमधून (BCCI) कॉल आला आणि त्या कॉलची शहानिशा न करता क्युरेटरने पीच वर पाणी टाकत रोलर चालवले ज्यामुळे दुसऱ्या दिवशी विकेट पाटा झाली होती. भारताने तो सामना गमावला आणि यानंतर शास्त्री आणि अरुण प्रचंड संतापले होते. यानंतर बीसीसीआयने दखल घेत पीच क्युरेटर बदलला होता.

महत्वाच्या बातम्या