पिंपरीत प्रेमवीराची बॅनरबाजी, ‘shivade i am sorry’चे फलक

टीम महाराष्ट्र देशा – पिंपळेसौदागर या परिसरातील शिवार चौकात ‘shivade i am sorry’ असा मजकूर लिहिलेले फळक झळकले आहेत. आज पहाटेच्या दरम्यान हे फलक लावले असल्याचे समोर आले आहे.

बॅनरवरील मजकूर पाहता हा एखाद्या प्रेमवीराचा प्रताप असावा असे दिसते. हे फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून बॅनरचे छायाचित्रही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

शिवार गार्डन येथील बीआरटी मार्गाच्या लगत असलेल्या विजेच्या खांबांवर ‘shivade i am sorry’ असा मजकूर असलेले फलक लावले आहेत. सुमारे 14 ते 15 फलक लावले आहेत.
दरम्यान, हे फलक पिंपळेसौदागर परिसरात चर्चेचा विषय ठरले आहेत. फलक नेमके कोणी लावले आहेत. हे अजून समोर आले नाही. या बॅनरबाजीमुळे त्या प्रेमवीराला आता ‘शिवडे’ची माफी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अटलजी नंतर ज्यांच्या पाया पडावे अशी पावले सापडत नाहीत – रामदास फुटाणे

You might also like
Comments
Loading...