fbpx

पिंपरी महापालिका राबविणार ई – वेस्ट संकलन महाअभियान

pcmc-main

पुणे – शहरात ई-कच-याची वाढती समस्या व त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात ई-वेस्ट संकलन महाअभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान 17 डिसेंबर रोजी शहरातील विविध 14 ठिकाणी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत राबविण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ई-कचरा गोळा करण्याकडे दुर्लक्ष केले जात असून त्याचे घातक परिणाम शहराच्या आरोग्यावर होत आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेऊन पर्यावरण संवर्धन समिती (ईसीए)ने महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्यासोबत दोन बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये हे अभियान राबविण्याचे ठरविण्यात आले. भोसरी येथील ई प्रभाग मुख्य कार्यालयात बैठक झाली. प्रसंगी ई प्रभागातील हौसिंग सोसायट्याचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांना ई-वेस्ट संकलन महाअभियानाबाबत सविस्तर माहिती व महाअभियानाचे स्वरूप स्पष्ट करताना महाअभियान प्रमुख विकास पाटील यांनी ई-वेस्टचे मानवी आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम याची माहिती दिली. शहरात साठून राहिलेले ई-वेस्ट भंगार साहित्य खरेदी करणारे हातगाडीवाले यांना न देता ते शास्त्रीय पद्धतीने विघटन करणा-या यंत्रणांना दिले जावे याचे जनजागरण करण्यात आले. या अभियानांतर्गत शहरात एकूण 200 ई – वेस्ट संकलन केंद्र उभारली जाणार आहेत. या सर्व केंद्रांवर महाविद्यालयीन विद्यार्थी मदत व जागृती करण्यासाठी नेमण्यात येणार आहेत. ज्या वसाहतींकडून शंभर किलोपेक्षा अधिक ई-कचरा देण्यात येईल, अशा वसाहतींचा ईसीएकडून विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

2 Comments

Click here to post a comment