विद्यार्थ्यांचं वर्गातच धुव्वा धुव्वा: थेट शाळेच्या वर्गाचा हुक्का मारण्यासाठी वापर

पुणे: विद्येच माहेरघर असणाऱ्या पुण्यामधील पिंपरी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही विद्यार्थी हुक्का मारण्यासाठी चक्क शाळेच्या वर्गाचाच वापर करत असल्याच उघड झाल आहे. पिंपरी चिंचवडमधील नावाजलेल्या शाळेमध्ये हि सर्व घटना घडली असून शाळा प्रशासनाने या प्रकरणी दोन विद्यार्थांच निलंबन केले आहे.

निगडीतील यमुनानगरमध्ये असणाऱ्या या शाळेमध्ये सध्या सहामाई परीक्षा सुरु आहे. पेपर झाल्यानंतर काही विद्यार्थी वर्गातच हुक्का मारत असल्याच उघड झाल्यावर शिक्षकही हादरून गेले . दरम्यान याच शाळेमध्ये काही दिवसांपूर्वी विद्यार्थी हुक्याचे साहित्य घेवून येत असल्याचा संशय आल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांची दप्तरेही तपासली होती. मात्र त्यावेळी काही उघड झाल नव्हत.