पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भाटनगर प्रकल्पाचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

pcmc-main

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भाटनगर पुनर्वसन प्रकल्पातील इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात येणार आहे. यासंबंधीच्या झालेल्या महापालिका स्थायी सभेत मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे होत्या.

पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील ज्या इमारतींना ३० वर्षे पूर्ण झाली आहेत, त्या बांधकामांना नैसर्गिक आपत्तीपासून व इतर संभावित धोक्यापासून संरक्षित करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘स्ट्रक्चरल ऑडिटर’मार्फत संरक्षणात्मक परीक्षण करून ते बांधकाम सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र घेण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे सन १९८९ ते १९९१ दरम्यान बांधून पूर्ण झालेल्या भाटनगर पुनर्वसन प्रकल्प इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात येणार आहे. सदर इमारती ‘जी प्लस ३’ स्वरूपाच्या असून, एका इमारतीत ६४ गाळे याप्रमाणे १०८८ गाळे आहेत. सद्यस्थितीत या इमारती जीर्णावस्थेत असल्याने आयुक्तांकडील १० जुलैच्या मंजूर प्रस्तावानुसार भाटनगर प्रकल्पातील इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसे निर्देश झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन स्थापत्यचे कार्यकारी अभियंता यांनी दिले आहे. त्याअनुषंगाने सन २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात प्रभाग क्र.४२, भाटनगर येथील जुन्या इमारती पाडून नवीन इमारतींचे बांधकाम करणे व इतर स्थापत्यविषयक कामे करणे या कामांचा समावेश आहे. संरक्षणात्मक परीक्षणासाठी मान्यताप्राप्त ‘स्ट्रक्चरल ऑडिटर’ यांचे पॅनेल तयार करण्यात आले आहे. या पॅनेलमध्ये मे. के. बी. पी. सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांचा सल्लागार म्हणून समावेश आहे. त्यांना ‘स्ट्रक्चरल ऑडिटर’ म्हणून नेमून, फीपोटी ३ लाख ४८ हजार रुपये व त्यावरील ‘जीएसटी’सह येणा-या खर्चास स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'