पिंपरी-चिंंचवड च्या महापौर पदावर पुन्हा एकदा ‘महेशदादांच’ वर्चस्व

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय जनता पार्टीचे सहयोगी सदस्य आ. महेश लांडगे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक स्वपक्षासह विरोधी पक्षातील विरोधकांना भविष्यात धोका निर्माण करेल, या विचाराने त्यांनी महेश लांडगे ना धारेवर धरले होते. त्यांनी आखलेल्या प्रकल्पांना चित पट करण्यासाठी ते यशस्वी झाले होते. परंतु आखाड्यात माहीर असलेल्या आ. लांडगे यांनी महापौरपदासाठी राहुल जाधव यांना आणून पक्षीय विरोधकांसह इतर पक्षातील विरोधकांना चारी मुंड्या चीतपट केले. दरम्यान शहराध्यक्षांच्या या घटनेला पक्षातील लोकांनीच दणका दिल्याची चर्चा देखील पालिका वर्तुळात आहे. भाजपकडून महापौरपदासाठी भोसरी विधानसभा मतदारसंघातील राहुल जाधव आणि उपमहापौरपदासाठी चिंचवड मतदारसंघातील सचिन चिंचवडे यांची नावे निश्चित केली.

पालिकेतील विरोधी पक्ष राष्ट्रवाडीकडून महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत उडी घेण्यात आली आहे. विनोद नेते आणि विनया तापकीर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शनिवारी महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार का, तो फक्त फार्स राहणार हे पाहणे औचित्याचे ठरणार की, नाराज गटाकडून राष्ट्रवादीला बळ देण्यात येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. नियमानुसार सत्ताधारी नगरसेवक व्हीप पाळणार का विरोधकांना मदत करणार यावर सर्व अवलंबून आहे; परंतु व्हीपच्या पुढे नगरसेवक जाणार नाहीत असा अंदाज असल्यामुळे राहुल जाधव यांची महापौर म्हणून निवड निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

भोसरी मतदारसंघातील आ.लांडगे यांचे विरोधक राष्ट्रवादी, शिवसेना त्यांना नेहमीच कात्रीत पकडण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. त्याबरोबर भाजपातील अंतर्गत राजकारणातून लांडगे यांना मात देण्याचा प्रयत्न आहे. परंतु त्यांना यामध्ये यश मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या आठवड्यात चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील विकास कामांच्या उद्धघाटनासाठी शहरात आले होते; परंतु ऐनवेळी भोसरीतील उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आ.लांडगे यांचे विरोधक यशस्वी झाले होते. त्याची सल आ. लांडगे समर्थकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. या आत्मविश्वासातून पक्षीय विरोधकांनी काही झाले तरी लांडगे समर्थकास महापौर होऊ द्यायचे नाही, यासाठी प्रयत्न सुरु होते, दरम्यान त्यात आ.लांडगे यांनी हाडाचा कुस्तीपट्टू असल्याचे पटवून देण्यात यश मिळविले आहे.

मराठा आरक्षण : कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण आम्हीच देणार

मतदानापुर्वींंचा शेवटचा रविवार भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावला सार्थकी