पिंपरी-चिंचवड : महापौरपदी राहुल जाधव मनसेची भाजपला मदत

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. सत्ताधारी भाजपचे महापौरपदाचे उमेदवार राहुल जाधव यांना ८०, तर राष्ट्रवादीला ३३ मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक गैरहजर राहिले. भाजपचेही ३ नगरसेवक गैरहजर राहिले. त्यामुळे महापौरपदी भाजपचे राहुल जाधव विजयी झाले. मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी भाजपला मतदान केले यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

उपमहापौरपदासाठीही घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपच्या सचिन चिंचवडे यांना ७९, तर राष्ट्रवादीला ३३ मते मिळाली. त्यामुळे उपमहापौरपदी सचिन चिंचवडे यांनी निवड झाली. या निवडणुकीत . तर शिवसेनेचे ९ नगरसेवक तटस्थ राहिले.

 

पुण्यात सत्ताधारी भाजपला दणका; पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने राखला गड

1 Comment

Click here to post a comment