स्थायी समिती अध्यक्षपदावरून पिंपरीमध्ये यादवी ; महापौर नितीन काळजे यांचा राजीनामा

टीम महाराष्ट्र देशा : पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये स्थायी समितीच्या अध्यक्ष पदावरून वादळ उठल आहे. आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्यात हे अध्यक्षपद आपल्या गटाकडे असावे यासाठी जोरदार संघर्ष सुरु होता मात्र, स्थायी समिती पुन्हा एकदा आपल्यकडे ठेवण्यात आमदार लक्ष्मण जगताप यांना यश आल आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या पत्नी आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थक ममता गायकवाड यांच्या गळ्यात स्थायीच्या अध्यक्षपदाची माळ पडली आहे.

Loading...

ममता गायकवाड या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या पत्नी आहेत, गायकवाड हे आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक आहेत. निवडणुकीच्या आधी त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता. गायकवाड यांच्या निवडीमुळे स्थायी समितीपद यावेळी देखील आमदार जगताप यांच्या समर्थकाकडे आले आहे

तर आमदार महेश लांडगे गट या निवडीने कमालीचा संतापला आहे. या निवडीवरून महापौर नितीन काळजे यांनी महापौरपदाचा तर नगरसेवक राहुल जाधव आणि शीतल शिंदे यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा सादर केला आहे. महापौर नितीन काळजे यांनी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला तर राहुल जाधव आणि शीतल शिंदे यांनी सभागृह नेते एकनाथ पवार यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला.

शहराच्या स्थायी समिती सभापतीपदी राहुल जाधव यांना संधी देण्यात माझ्या पदाची भौगोलिक अडचण झाली असेल म्हणून आमदार महेश दादा लांडगे यांच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या वृत्तीचा आदर करुन मनापासून महापौर पदाचा राजीनामा देत आहे असे नितीन काळजे यांनी महापौरपदाचा राजीनामा देताना सांगितले आहे.Loading…


Loading…

Loading...