राष्ट्रवादी कॉंग्रेसने बडा शिलेदार गमावला, कोरोनाने दत्ताकाकांचं निधन

datta sane

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज (शनिवारी) सकाळी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती.

साने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते. चिखली परिसरातून तीनवेळा ते निवडून आले होते. लॉकडाउन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली. अन्नधान्यांचे वाटप केले होते.

चिंताजनक : राज्यात आज कोरोनाच्या ६३६४ नवीन रुग्णांचे निदान

25 जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना कोरोनासह न्युमोनियाची देखील लागण झाली होती. दत्ता साने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते. चिखली परिसरातून ते तीनवेळा ते निवडून आले होते. लॉकडाउन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली होती. कोणीही उपाशी राहू नये यासाठी अन्नधान्यांचे वाटप केले होते. यामुळे साने यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, दत्ता साने यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी हर्षदा, 19 वर्षीय मुलगा आणि 16 वर्षीय मुलगी तर दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. दत्ता यांच्या अशा जाण्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दत्ता साने हे ‘दत्ताकाका’ नावाने अख्खा चिखलीमध्ये प्रसिद्ध होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते.

राज्यात कोरोनाचा हाहाकार,आणखी एक महत्वाची परीक्षा सरकारने केली रद्द