पिंपरी-चिंचवड : भाजप लोकसभेचे रणशिंग फुंकणार,शक्तीप्रदर्शनाची जय्यत तयारी

टीम महाराष्ट्र देशा- आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नोव्हेंबर-डिंसेंबरमध्ये राज्यभराचा राजकीय दौरा करणार असून त्याची सुरुवात तीन नोव्हेंबरला पिंपरी-चिंचवड शहरातून होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निगडीत होणाऱ्या अटल संकल्प महासंमेलनात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते, आमदार, खासदार या वेळी उपस्थित राहणार आहेत.

शरद पवार -राज ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढवली तरी भाजपाला फरक पडत : दानवे

शिवसेनेचा मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपने शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानात शनिवारी (३ नोव्हेंबर) दुपारी चार वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या महामेळाव्यासाठी शहर भाजपची जोरदार तयारी सुरू आहे. या मेळाव्यासाठी लाखभर नागरिक जमवण्याचे भाजपचे नियोजन आहे.

आगामी निवडणुकीत शिवसेनाही साथ देईल : दानवे

दोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्याचे निश्चित केले होते.युती होईल की नाही अद्याप निश्चित नसल्याचे खुद्द दानवे यांनी या वेळी सांगितले होते. तर मावळ लोकसभेसाठी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप प्रबळ इच्छुक आहेत. त्याच प्रमाणे शिरूरसाठी भोसरीचे अपक्ष आणि भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे प्रबळ इच्छुक आहेत.

मला राफेलही कळतो आणि आदर्शचा घोटाळाही : दानवे