fbpx

तुकाराम मुंडेंची बदली करा; भाजप नगरसेवकांचा मुख्यमंत्र्यांकडे धावा

tukaram-mundhe-

पुणे: आपल्या दबंग कामगिरीमुळे जनमानसात प्रसिद्ध असणारे मात्र नेत्यांना नकोसे वाटणारे आईएएस अधिकारी तुकाराम मुंडे आणि वाद हे समीकरणच आहे. मग सोलापूर येथील जिल्हाधिकारी असो कि नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त पद, मुंडे आणि नेत्यांमध्ये रंगणारा वाद कायमच दिसून आला आहे. आता
पुणे परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद सांभाळताना देखील हीच परिस्थिती दिसत आहे.

तुकाराम मुंडे त्यांच्यामुळे पीएमपीएलचे उत्त्पन्न वाढण्याची अपेक्षा होती, मात्र ते वाढले नसून घटल आहे. तसेच त्यांनी अनेक कामगारांना रस्त्यावर आणल, ते कोणाची ऐकत नसून हेकेखोर असल्याचा आरोप करत पिंपरी चिंचवड महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी मुंडेंच्या बदलीची मागणी केली. तसेच हि माझ्या एकट्याची मागणी नसून सर्व भाजप नगरसेवकही याच मताचे असल्याचे त्यांनी सांगितले. पवार यांनी या विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाहि पत्र पाठवले आहे.

काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंडे यांनी १५८ पीएमटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. यामुळे पुणे तसेच पिंपरी महापालिकेचे पदाधिकारी त्यांच्यावर नाराज आहेत. याचमुळे पिंपरी चिंचवड पालिकेचे सत्तारूढ नेते एकनाथ पवार यांनी त्यांची बदली करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे. दरम्यान ही पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केल आहे.