Pimple on face- पिंपल्समुळे त्रस्त आहात?, हे पाच उपाय करा

1. लिंबाचा रस: एका वाटीत लिंबाचा रस घ्या. त्यामध्ये कापसाचा बोळा टाकून तो पिळून घ्या. हा बोळा पिंपल असलेल्या जागेवर लावा. दहा मिनिटं लिंबाचा रस चेहऱ्यावर ठेवा. यानंतर चेहरा पाण्याने धुवा आणि टॉवेलने हलक्या हाताने पुसून घ्या. ही प्रक्रिया दिवसातून दोन वेळा करा. काही दिवसांतच फरक जाणवेल.

2. लिंबाचा रस आणि मध : एका वाटीत लिंबाचा रस आणि मध घेऊन ते एकत्र करा. हे मिश्रण पिंपल आलेल्या जागेवर लावा आणि पाच मिनिटं तसंच ठेवा. त्यानंतर पाण्याने धुतल्यानंतर चेहरा कोरडा करा. हा उपाय दिवसातून एकदा केल्याने पिंपल कमी होतील.

3. लिंबू आणि अंड्याचा पांढरा भाग: एका अंड्याचा पांढरा आणि पिवळा भाग वेगळा करा. पांढरा भाग घेऊन त्यात दोन चमचे लिंबाचा रस टाकून चांगलं फेटून घ्या. हे मिश्रण तीन भागात विभागा. पहिला भाग त्वचेवर लावा आणि पाच ते सात मिनिटं तसंच ठेवा. त्यानंतर दुसरा भाग त्यावर लावा. ते पण पाच ते सात मिनिटं ठेवा. यानंतर तिसरा भागही लावा. ते पाच ते सात मिनिटं ठेवल्यानंतर ते गरम पाण्याने धुवून घ्या आणि चेहरा हलक्या हाताने कोरडा करा.

4. लिंबू आणि बेसन: एका वाटीत बेसन (चण्याचं पीठ) घ्या. त्यात लिंबाचा रस मिसळा. एकत्र करुन लेप बनवा. हा लेप पिंपल आलेल्या जागेवर लावून काही मिनिटं ठेवा. त्यानंतर हा भाग कोमट पाण्याने धुवा आणि स्वच्छ टॉवेलने पुसून घ्या. यानंतर त्वचा कोरडी असल्यात मॉइश्चरायजर लावा.

5. लिंबू आणि दही : एका वाटीत लिंबाचा रस आणि दही घेऊन एकत्र करा. ही पेस्ट तारुण्यापिटीका असलेल्या भागावर लावा. काही मिनिटं ठेवल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. हा उपाय नियमित केल्याने पिंपलची समस्या दूर होईल.