नरेंद्र मोदींच्या बायोपिकचा ट्रेलर काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई  : ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ५ दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर नरेंद्र मोदी यांच्या बयोपिक चा ट्रेलर लौंच करण्यात आला. बघता बघता हा  ट्रेलर प्रचंड व्हायरल देखील झाला. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नरेंद्र मोदींच्या बायोपीकचा ट्रेलर सोशल मिडीयावरून काढून टाकण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात आज याचिका दाखल करण्यात आली आहे.

हा ट्रेलर मतदारांना प्रभावित करू शकतो त्यामुळे हा ट्रेलर सर्व सोशल मिडियावरून काढून टाकण्यात यावा असे देखील या याचिकेत म्हटले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील या बयोपिक ला विरोध करत आम्ही हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असे म्हटले होते. अशाप्रकारे निवडणुकांच्या काळात सिनेमा प्रदर्शित करणे आचारसंहितेचे उल्लंघन करणे आहे असेदेखील त्यांनी म्हटले होते. ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा सिनेमा १२ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. त्याऐवजी आता तो येत्या ५ एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याने विरोधी पक्षाकडून यावर जोरदार टीका होत आहे. या सिनेमात विवेक ओबेरॉयने नरेंद्र मोदी यांचा रोल साकारला आहे.