अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचे चित्र दुपारपर्यंतच होणार स्पष्ट

sangram jagtap and sujay vikhe

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर लोकसभा मतदार संघ व शिर्डी लोकसभा मतदार संघ या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी होणार असून याची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. यासाठी सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. सकाळी आठ पासून मोजणीस प्रारंभ होणार असून दुपारपर्यंत ईव्हीएमची मतमोजणी पूर्ण होऊन चित्र स्पष्ट होईल, मात्र त्यानंतर काही व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या व टपाली मतदान मोजण्यास वेळ लागणार असल्याने अधिकृत निकाल सायंकाळी सात वाजेपर्यंत जाहीर होऊ शकतो.

जिल्हा प्रशासनाने नगर व शिर्डी अशा दोन्ही मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. एमआयडीसीतील राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ही मतमोजणी होणार आहे. त्यासाठी सुमारे दीड हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताफा सज्ज झाला असून दोन टप्प्यात या कर्मचाऱ्यांंना मतमोजणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यातील पहिले प्रशिक्षण १४ मे रोजी होणार आहे. त्यानंतर २२ मे रोजी मतमोजणीची रंगीत तालीमच गोडाऊनमध्ये होणार आहे. नगर मतदारसंघात २०३० मतदान केंद्रांवर ६४.२६ टक्के, तर शिर्डीत १७१० मतदान केंद्रावर ६४.५४ टक्के मतदान झालेले आहे.Loading…
Loading...