जवानांवर दगडफेक करणारे दहशतवादीचं : लष्करप्रमुख

बीआरओच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीत जवान मृत्युमुखी

टीम महाराष्ट्र देशा- काश्मिरी जनतेसाठी रस्ता, पूल बनवण्याचे काम करणाऱ्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या (बीआरओ) ताफ्यावर झालेल्या दगडफेकीत गुरुवारी राजेंद्र सिंह या जवानाचा मृत्यू झाला होता. या घटनेवर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

‘दगडफेकीत एका जवानाचा मृत्यू ओढवला. तरीही काही जण म्हणतात, दगडफेक करणाऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देऊ नका. दगड भिरकवणारे हे दहशतवादीच आहेत’, असे लष्करप्रमुख रावत म्हणाले. ‘दगडफेकीत जवानाचा मृत्यू झाल्याने आता दगडफेक करणाऱ्यांना दहशतवाद्यांचे पाठिराखे का समजू नये? त्यांना दहशतवाद्यांसारखीच वागणूक का देऊ नये? हे सर्व कट्टरतावादी संघटनांचे सक्रिय दहशतवादीच आहेत’, असे रावत म्हणाले.

रोहिंग्यांना परत पाठवणार : राजनाथ सिंह

करणी सेनेच्या गुंडांनाही जीपला बांधून फिरवा – उमर अब्दुल्ला