बोल्ड ड्रेसवरील नोरा फतेहीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

Nora

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नोराचे लाखो चाहते आहेत. नोरा तिच्या डान्स आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत राहते. सोशल मीडियावर तिने घातलेल्या पांढऱ्या रंगाच्या बोल्ड पोषाखातले फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. यामुळे कमेंट करत नेटकऱ्यांनी तिच्या ड्रेसवरून तिला ट्रोल केले आहे.

नोरा गाडीतून उतरतल्यानंतर नोराने पांढऱ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेसवर अनेक फोटो क्लीक करण्यात आले. अनेकांना नोराचा हा लूक आवडला तर काहींनी तिच्यावर टीका केली आहे. नोराने परिधान केलेला ड्रेस नीट नसून ती सतत त्या ड्रेसला नीट करताना दिसत आहे. त्यामुळे नोराला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. ‘परिधान केलेल्या कपड्यांमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं नसेल तर तुम्ही असे कपडे बाहेर कुठे जातांना का परिधान करतात’ असे एक नेटकरी म्हणाला.

‘जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी जात आहोत तेव्हा कम्फर्टेबल ड्रेस परिधान करणे महत्त्वाचे आहे. ती अस्वस्थ दिसत आहे,’ असे दुसरा नेटकरी म्हणाला. नोराने २०१३ मध्ये ‘रोर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली. नोरा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त आणि शरद केळकरसोबत दिसली होती. नोराचे सौंदर्य जरी सगळयांना घायाळ करणारं आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक अक्टीव्हीटीवर चाहत्यांच्या नजरा कायम असतात. तिच्या या फोटोमुळे सोशल मीडियावर लाईक कमेंटस् पहायला मिळत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या