मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तडीपार गुंडासोबत फोटो व्हायरल

devendra fadanvis with criminal1

औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एका तडीपार गुंडाचा फोटो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. राहुल साहेबराव चाबुकस्वार असं या तडीपार गुंडाचं नाव आहे.

राहुल साहेबराव चाबुकस्वार याच्यावर औरंगाबाद शहरातील पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या गुंडाने स्वत: फेसबुकवर मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. राहुल चाबुकस्वार औरंगाबादमधील हुसेनी कॉलनीचा रहिवाशी आहे.

औरंगाबाद पोलिसांनी राहुल चाबुकस्वार या गुंडाला शहरातून 2 वर्षांसाठी तडीपार केलं आहे. त्याचावर औरंगाबाद शहरातील जवाहारनगर, मुकुंदवाडी आणि एम सिडको पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न करणे, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.