..अन् पंकजा मुंडे यांनी चालकासोबत काढला फोटो

पंकजा मुंडे

औरंगाबाद : भाजप नेत्या पंकजा मुंडे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. यामुळे राजकीय पटलावर आणि सोशल मीडियावरही त्यांचा फॅन फॉलोविंग चांगलाच आहे. विविध कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे, तसेच मान्यवरांना भेटीबद्दलची माहिती त्या नेहमी शेअर करतात. सध्या पंकजा या त्यांच्या कुटुंबियांसोबत महाबळेश्वर येथे फिरण्यास गेल्या आहेत. राजकीय आणि सामाजिक कार्यातून थोडासा विसावा म्हणून पती आणि मुलांसोबत त्यांनी महाबळेश्वरमधील थंड हवेचा आनंद घेतला.

नुकतेच पंकजा यांनी फेसबूकवर एका वाहनचालकासोबत सेल्फी काढून फोटो पोस्ट केला आहे. महाबळेश्वर येथून परतत असताना वाहनचालकाने हात दाखवून गाडी थांबवण्याची विनंती केली. यावर त्यांनी गाडी थांबवून वाहनचालकाची भेट घेतली. संबधित वाहनचालकाचे नाव लोंढे असून ते पंकजा यांचे मोठे चाहते असल्याचे त्यांनी सांगितले. लोंढे यांच्या आग्रहाखातर पंकजा मुंडे यांनी त्यांच्यासोबत सेल्फीही काढला. आणि तो फेसबूकवर पोस्ट केला. त्यात त्या म्हणतात,

“लोकांच्या प्रेमाचा परिचय कसा येतो याचा काही अंदाज बांधता येत नसतो.. पण मला सुदैवाने असा अनुभव सदैव येतो.. दोन दिवस हवा बदल म्हणुन मी पती आणि मुलासमवेत महाबळेश्वर येथे गेले होते परत येताना रस्त्यात नेहमी प्रमाणे लोकांनी हात करून गाडी थांबवली driver लोंढे होते त्यांनी अगदी भावुक होऊन माझ्या कार्यक्रमाची इतमभूत माहिती ते कशी ठेवतात हे सांगितले अगदी माझ्या पोस्ट किती ते आपुलकीने like करतात हेही सांगितले. ..तितक्यात गाडीतील विद्यार्थी उतरले बाजूच्या बस मधील प्रवासी उतरले त्यांनी ही फोटो काढले….”

पंकजा मुंडे यांचे हे फोटोसेशन सुरू असताना त्यांचा मुलगा मात्र हे सर्व गाडीत बसून कौतुकाने पाहात होता.

महत्वाच्या बातम्या