पंचनामे न करता अधिकाऱ्यांचे फोटोसेशन, वाळू माफियांना दिले अभय!

पैठण : हिरडपुरी नदीपात्रात पोलीस प्रशासन, महसूल अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तसेच पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू सुरू असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. गोदावरी नदीच्या पाञात वाळू माफियांनी गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. बुधवारी (दि.७) याठिकाणी पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी फोटोसेशन करत माघारी फिरणे पसंद केल्याचे दिसते.

बुधवारी (दि.७) नायब तहसीलदार कमल मनोरे यांच्या नेतत्त्वाखाली महसूल पथकाने हिरडपुरी येथील गोदावरी नदी पात्रात जाऊन अवैध वाळू उपस्याची व वाळू साठ्यांची पाहणी केली. मात्र हजारो ब्रास वाळू साठ्यांचा पंचनामा न करताच वाळू साठे येथील कोतवालाच्या ताब्यात देऊन पथक कोणतीही कारवाई न करता रिकाम्या हाताने परत फिरल्याचे समजते.

येथील सर्व प्रकार मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, सरपंच यांना माहीत असूनही ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. दरम्यान काल नायब तहसिलदार कमल मनोरे यांनी पथकासोबत तात्काळ पोलीस देण्याची मागणी पाचोड व पैठण पोलिसांकडे पत्रद्वारे केली. तसेच प्रभारी तहसीलदार दत्तात्रय निलावड यांनी वाळु विरोधी पथकाने वर्षभरात वाळु विरोधी काय कारवाई केली, पथकातील मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत.

याबाबत नायब तहसीलदार कमल मनोरे यांना विचारले असता त्यांनी आमच्या बरोबर पोलीस फोर्स नसल्यामुळे कारवाई केली नाही, यानंतर पुन्हा पोलिसांना बरोबर घेऊन कारवाई करण्यात येईल असे नायब तहसिलदार मनोरे यांनी सांगितले. पैठण तालुक्यातील गोदावरी नदीच्या वाळूला पैठण सह औरंगाबाद  जिल्हात सोन्याचा भाव मिळतो.

सलग पाच वेळा पैठण मधील चार वाळू पट्याचे लिलाव जाहिर केले. मात्र या लिलावा कडे कोपटटाणीही फिरकले नाही. नदी पात्रातुन अवैध वाळू उपसा सहज करता येतो याचा विचार करुणच वाळु तस्कर हे गोदावरी नदीच्या पात्रात अनेक ठिकाणाहुन सरार्सपणे वाळु उपसा करत आहेत.

सध्या पैठणच्या, टाकळी अंबड, नवगाव, कुरन पिंपरी, आपेगाव, दादेगाव, नायगाव, वडवळी या भागात गोदावरी नदी पात्रातुन वाळूची तस्करी होत आहे. ही अवैध वाळूची वाहतूक पैठण, पाचोड, एमआयडीसी, बिडकीन, चिकलठाना पोलीस व महसूलच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या