पुण्यात कडकडीत बंद; बाजारपेठाची क्षणचित्रे 

बाजारपेठ

पुणे: कोरेगाव भीमा येथे झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर आबेडकरीवादी संघटना आक्रमक झाल्याचं दिसत आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बंदचा परिणाम दिसून येत आहे.
pune station
कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी राज्यभरातील दलित संघटनांकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.
pune strick

आज मुंबई, पुणे, नाशिक या प्रमुख शहरांसह कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून राज्यभरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आहे. भीमा कोरेगाव हिंसाचाराचे पडसाद कालपासूनच राज्याच्या अनेक भागांमध्ये उमटायला सुरूवात झाली होती.
nishedh photo

सोमवारी रात्रीपासूनच शहरातील आंबेडकरी वस्त्या अस्वस्थ होत्या. पुण्यात देखील संपूर्ण बाजारापेठा बंद असून तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे.
pune city

IMP