भाजप आमदारांचा ‘हा’ फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल 

वेबटीम:तुम्ही कधी कोणाला येन पावसामध्ये झाडांना पाणी देताना पाहिलं आहे का? सहाजिकच तुमचं उत्तर असेल वरून पाऊस पडत असताना खाली झाडांना पाणी कोण घालणार. मात्र, असा प्रकार सत्य परिस्थितीमध्ये घडला आहे
मीरा-भायदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा येन पावसात झाडांना पाणी घालतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मेहता हे झाडांना पाणी घालत असल्याच दिसत आहेत. तर त्यांच्या सोबत असणाऱ्या दुसऱ्या लोकांनी वरून पडणाऱ्या पावसापासून वाचण्यासाठी छत्री धरल्याच दिसत आहे.
सध्या राज्यामध्ये सरकारकडून पावसाळ्यात चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्धिष्ट ठेवण्यात आलं आहे. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा झाडून कामाला लागल्या आहेत., अशातच आमदार साहेबांचा या फोटोवरून त्यांनी वृक्ष लागवडीचे ‘टार्गेट’ किती मनावर घेतल आहे हे दिसत आहे