Republic Day : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात तिरंगी फुलांची सजावट

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. मोठ्या उत्साहात 71 वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला जात आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देशाच्या संरक्षणार्थ तैनात असणाऱ्या सुरक्षा दलांच्या सलामीचा स्वीकार करतील. ज्यानंतर देशात असणाऱ्या विविध राज्य आणि केंद्र शासनाच्या सेवेत असणाऱ्या मंत्रालयांची झलक सादर केली जाणार आहे.

Loading...

याच पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात राष्ट्रीय ध्वजाप्रमाणे सजावट करण्यात आली आहे. पुण्यातील धायरी येथील कलाकार तसेच मोरया ग्रुपच्यावतीने ही सजावट करण्यात आलेली आहे. विशेष दिनाचे औचित्य साधून मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात येते. भारताच्या तिरंग्याप्रमाणे फुलांची केलेली सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान, दरवर्षीप्रमाणेच यंदाही दिल्लीतील राजपथ प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी आणि थरारक प्रात्यक्षिकांसाठी सज्ज झालं आहे. राजपथावर या दिवशी देशाच्या सामर्थ्य आणि संस्कृतीची झलक एकाच वेळी पाहता येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'