‘फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे तर मनमोहन सिंगांच्या काळात झाले होते’ ; फडणवीसांचा आरोप

manmohan singh

मुंबई : सध्या पेगासस स्पायवेअरची सगळीकडेच चर्चा आहे. इस्त्रायलच्या एनएसओ या फर्मवेअरने तयार केलेलं पेगासेस स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. इस्रायली फर्म पेगाससद्वारे आपल्या देशातील काही मंत्री तसंच पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आले असल्याचा दावा करण्यात येतोय.

पेगासस हे एक स्पायवेअर आहे. इस्त्रायलच्या NSO ग्रुपने हे स्पायवेअर बनवलं आहे. हे स्पायवेअर ज्यांच्या फोनमध्ये टाकण्यात आल्याची शक्यता असलेल्यांची एक यादी सध्या लीक झाल्याची माहिती आहे. पेगासस स्पायवेअर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देशातील पत्रकार आणि राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा दावा ‘द वायर’सह इतर काही मीडिया संस्थांनी केला. त्यानंतर आता त्याचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उमटत आहेत. या प्रकरणावरुन विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं आहे.

यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन फोन टॅपिंगवरून तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवरच आरोप केले. तसेच काँग्रेसच्या काळात आणि विविध राज्यांमध्ये विविध सरकारांच्या काळात फोन टॅप कसे केले गेले, याची माहितीही दिली. भारतीय संसदेच अधिवेशन डिरेल करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून होतोय.

मंत्रिमंडळाचा विस्तार करून सर्व जातीधर्माच्या लोकांना मोदींनी संधी दिली. त्यामुळे अधिवेशन डिरेल करण्याच्या उद्देशान अधिवेशनाच कामकाज डिस्टर्ब केल जात आहे, असं सांगतानाच पॅगसेसच्या बातमीला कोणताही आधार नाही. भारत सरकारची कोणतीही एजन्सी अश्या कोणत्याही पद्धतीची हॅकींग करत नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. तसेच केंद्र सरकारने कुणाचेही फोन टॅप केले नाहीत. विरोधकांचे आरोप दिशाभूल करणारे आहेत. असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP