‘फोन पे’ चा ग्राहकांसाठी सतर्कतेचा इशारा; तुमचे खाते होऊ शकते रिकामे

'फोन पे

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर असल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन व्यवहार हे मोठ्या प्रमाणात केले गेले. तरत आता डीजीटल व्यवहार लोकांच्या अंगवळणी पाडाळे आहेत. यामध्ये डिजिटल पेमेंटसाठी भारतात मोठ्या प्रमाणात पेटीएम, गुगल पे , फोन पे हे  अॅप वापरलं जातं.लोकांकडून बाहेर जाणे टाळण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाईन ट्रांजेक्शन केली जातात

मात्र यामुळे अनेकदा ग्राहक वेगवेगळ्या ऑफरला देखील बळी पडत असतात. याचा फायदा अनेक सायबर गुन्हेगारांकडूनही घेतला जात असल्याच्या अनेक घटना आपल्या समोर आल्या आहेत. त्यामुळे सायबर सुरक्षेबाबत अधिक जागरूक होणं आवश्यक आहे. यामध्ये आता फोन पे या पेमेंट सेवा देणाऱ्या ॲपच्या ग्राहकांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. तुम्हाला ‘फोन पे’द्वारे कॅगबॅक मिळाल्याचे कॉल येऊ शकतो ज्यामुळे फक्त एक कॉल येईल आणि तुमचे बॅंक अकाउंट पूर्ण रिकामे होईल. येणारा कॉलही असा असेल की तुम्हाला थोडासाही संशय येणार नाही. कॉल करणारी व्यक्ती तुम्हाला आपण फोन पे चे कर्मचारी असल्याचे सांगेल आणि नंतर तुमच्या पैशांची चोरी केली जाईल.

त्यामुळे आता महाराष्ट्रातील ठाणे पोलिसांनी यासंदर्भातील अलर्टदेखील दिले आहे. बनावट लिंक किंवा बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या बॅंक खात्याशी निगडीत सर्व माहिती अशा सायबर चोरांपर्यत पोचते. तुमचे बॅंक खाते, इंटरनेट बॅंकिंग क्रेडेन्शियल इत्यादी महत्त्वाची माहिती चोरांपर्यत पोचते. हे सायबर गुन्हेगार तुम्हाला कॉल करतात कॅशबॅक ची ऑफर दिली जाते. आणि ग्राहकांच्या खात्यावर डल्ला मारला जातो. त्यामुळे अशा फसव्या फोन कॉल पासून सावध रहा. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. कारण कॅशबॅक ऑफरसाठी कोणतीही कंपनी कधीही कॉल करत नाही.

महत्वाच्या बातम्या