मागणी नसताना ऑनलाईन औषध विक्री कशाला आणली ? :महेश झगडे

पुणे : भारतातातील औषध बाजार हा १ लाख २० हजार कोटींचा असून जनतेकडून मागणी नसताना ऑनलाईन औषध विक्री कशाला आणली ? असा सवाल अन्न आणि औषध प्रशासनाचे निवृत्त आयुक्त महेश झगडे यांनी आज विचारला .

‘पुणे महानगर परिषद’ या संस्थेतर्फे ‘ऑन लाईन औषध विक्री -योग्य की अयोग्य ‘या गाजत असलेल्या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते . गुरुवार, दि. 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता हे चर्चासत्र पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ येथे झाले ,त्यात झगडे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले .

Loading...

महेश झगडे म्हणाले ,’औषध विक्री आणि त्याबाबाबतचे कायदे चांगले आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नाही . ऑनलाईन औषध विक्री ला परवानगी देण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते . गुटखा वाईट असून तो कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतो ,हे कळायला ३० वर्षे गेली ,ऑनलाईन औषध विक्रीच्या बाबतीत ३० वर्षांनी तसेच काही दुष्परिणाम ऐकायला मिळाल्यास तेव्हा काय करणार ? कोटयावधी प्रिस्क्रिप्शन ऑनलाईन कशी तपासणार ? या प्रश्नी औषध विक्रेत्या संघटना ,नागरिक ,ग्राहक संघटना उशिरा जाग्या झाल्या असून रुग्णांच्या बाजूने लढणाऱ्या संघटनांची तर वानवाच आहे ‘अशी खंत झगडे यांनी व्यक्त केली .
हे चर्चासत्र उच्चस्तरीय सरकारी आस्थापनांनी का आयोजित केले नाही ? असा सवालही त्यांनी केला . अन्न आणि औषध प्रशासन तसेच संबंधित सरकारी संस्था या विकलांग झालेल्या संस्था आहेत ,असेही ते म्हणाले .‘पुणे महानगर परिषद‘चे निमंत्रक गणेश सातपुते यांनी प्रास्ताविक केले . महेश महाले यांनी सूत्रसंचालन केले .

यावेळी या चर्चासत्रात माजी आयुक्त (अन्न औषध प्रशासन ) महेश झगडे, हदयरोग तज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे, जनरल प्रॅक्टीशनर डॉ. चंद्रकांत परुळेकर,सायबर क्राईम प्रमुख राधिका फडके, औषध विक्रेता राष्ट्रीय संघटना सदस्य वैजनाथ जागुष्टे, औषध विक्रेता महाराष्ट्र संघटना संघटक सचिव मदन पाटील, ग्राहक पेठ कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, ऑनलाईन औषध विक्रेते ईझी फार्मा चे संचालक अनिकेत बोरा, आऊटसोर्सिंग प्रायव्हेट एस. वाय.एस. लॉजिक लिमिटेड चे संचालक समीर गोडबोले यांचा सहभाग होता .

औषध विक्रेता महाराष्ट्र संघटना संघटक सचिव मदन पाटील म्हणाले ,’समाजाचे आरोग्य ऑनलाईन औषध विक्री मुळे बिघडणार असून यासंबंधी औषध विक्रेत्यांचा २८ तारखेचा बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले .

सूर्यकांत पाठक म्हणाले ,’ऑनलाईन विक्रीच्या निमित्ताने परकीय कंपन्या मोठ्या प्रमाणात आक्रमण करीत असून मूठभरांच्या हातात तसेच अंबानी -अदाणींच्या हातात सर्व सत्ता द्यायची आहे का ? त्यातून त्यांनी पुढे किमती वाढविल्यास कोण रोखणार ? ऑनलाईन मुळे बेरोजगारीही वाढेल याचा धोका आहे .

डॉ . ऋतुपर्ण शिंदे म्हणाले ,’फार्मासिस्ट हे व्यावसायिक तज्ज्ञ असतात त्यामुळे त्यांच्यावर भरवसा ठेवता येतो . मात्र ,डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन ला चोरूनही ऑनलाईन खरेदी शक्य असल्याने काळजी घ्यावी लागणार आहे . ऑनलाईन खरेदीतून रुग्णाला कमी पैशात औषधे मिळणार असतील तर विरोध नाही मात्र त्यांची विश्वासार्हता तपासावी लागणार आहे .

ऑनलाईन औषध विक्री प्रतिनिधी अनिकेत बोरा म्हणाले ,’ज्या ग्राहकांना जुनाट विकार आहेत आणि दरमहा ठरलेली औषधे घ्यावी लागतात,अशाना ऑनलाईन चा फायदा होऊ शकतो . खात्रीने ,ठरलेल्या वेळी औषधे मिळतील . ऑनलाईन विक्रेते देखील शासनाकडूनच प्रमाणित असतात ,आणि प्रशिक्षित असतात ,याकडेही त्यांनी लक्ष वेधले .

वैजनाथ जागुष्टे म्हणाले ,’तातडीच्या औषध सेवेसाठी शेजारच्या औषध विक्री दुकानाशिवाय पर्याय नाही . ऑनलाईन विक्रेते बेकायदेशीरपणे ,विना प्रस्क्रिप्शन औषधे भरमसाठ सवलतीत विकण्याची श्यक्यता नाकारता येत नाही ‘

चर्चासत्राचे संयोजन समिती सदस्य गणेश सातपुते (अध्यक्ष),महेश पाटील (कार्याध्यक्ष), संतोष पाटील (उपाध्यक्ष), किरण बराटे (उपाध्यक्ष), योगेश खैरे (योगेश खैरे), केदार कोडोलीकर (सरचिटणीस), संजय दिवेकर (खजिनदार), अनिरुद्ध खांडेकर (सहखजिनदार), दत्तात्रय जगताप (चिटणीस),  राजेश तोंडे (चिटणीस) उपस्थित होते .औषध विक्री क्षेत्रातील मान्यवर ,विक्रेते तसेच पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
माझी बदनामी करणारे 80 टक्के मराठा तरुण, आज मराठा समाजात जन्मल्याची लाज वाटते : तृप्ती देसाई
संज्याला मी चर्च गेट स्टेशनवर फाटक्या कपड्यात पेटी वाजवताना बघितलं होतं ; आज खात्री झाली : निलेश राणे
कोरोना इफेक्ट् : भारतात कंडोमच्या विक्रीत तब्बल ५० टक्क्यांनी वाढ
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
इटलीनंतर 'हा' देश सापडला कोरोनाच्या विळख्यात, चीनलाही टाकले मागे