फडणवीसांचा सेल्फगोल? पीएफआयने पत्रक प्रसिद्ध करून हवाच काढून टाकली

cm devendra fadanvis

मुंबई : राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी कारवायांमध्ये आरोपित, अनेक राज्यांमध्ये ज्या संस्थेवर बंदीची कारवाई केली जात आहे, राष्ट्रीय तपास संस्थेने तपास हाती घेतलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेला मुंबई महापालिकेने वैधता प्रदान केली आहे काय, असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता.

फडणवीस म्हणाले, मुंबई महापालिकेने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पीएफआय या संस्थेला दिली आहे. त्याबाबतचे अधिकृत परिपत्रक सुद्धा 18 मे रोजी जारी करण्यात आहे. हे परिपत्रक ट्विट करून हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणतात की, ज्या संघटनेवर देशविरोधी आणि समाजविरोधी कारवायांचा ठपका आहे, त्या संस्थेला हे काम देणे ही अतिशय धक्कादायक आणि गंभीर बाब आहे.

फडणवीस म्हणाले, केरळ, कर्नाटक, झारखंड, उत्तरप्रदेश या राज्यात या संस्थेवर बंदीची कारवाई केली जात आहे. भारतीय नागरिकत्व कायद्याच्या विरोधात जी निदर्शने अलिकडच्या काळात झाली, त्यातील दंगलींसाठी विदेशी निधी स्वीकारण्याचा आरोप या संस्थेवर आहे. ईडीने ही बँकखाती शोधून काढली आहेत.

अरेरे! गरोदर हत्तीणीला खायला दिलं फटाक्यांनी भरलेलं अननस,अखेर…

एनआयए या तपास संस्थेने त्याची दखल घेऊन आरोपपत्राची कारवाई प्रारंभ केली आहे. अशा संस्थेला मुंबई महापालिकेने हे काम देणे, म्हणजे एकप्रकारे त्यांच्या वैधतेवर शिक्कामोर्तब करण्यासारखे आहे. या सर्व प्रकाराला मुख्यमंत्र्यांची सहमती आहे का?, नसेल तर ज्यांनी याबाबतचा निर्णय केला, त्यांच्यावर काय कारवाई करणार आणि हा निर्णय मागे घेणार का, असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

फडणवीस यांच्या या आरोपानंतर फडणवीसांच्या आरोपातून पीएफआय संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सय्यद युसुफ सादात यांनी संघटनेचे पत्रक प्रसिद्ध करून हवाच काढून टाकली. लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर पीएफआय संघटनेकडून कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे काम हाती घेण्यात आले होते. या कामाची सुरुवात पुणे महापालिकेकडून करण्यात आली. पुणे महापालिकेकडून पीएफआय संघटनेला तशी परवानगीही देण्यात आली. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. जर मुंबई पालिकेनं परवानगी दिली तर फडणवीसांना धक्का बसला आहे. मग पुणे पालिकेनं परवानगी दिली तेव्हा धक्का बसला नाही का? असा थेट सवाल सय्यद युसुफ सादात यांनी विचारला आहे.

नितेश राणेंनी शेअर केलेला शिवरायांच्या पुतळ्याचा वादळातील व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल

‘मुंबई पालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे शिवसेनेला बदनाम करण्यासाठी भाजपकडून घाणरेडे राजकारण करण्यात आले आणि यासाठी पीएफआय संघटनेचा वापर करण्याचा प्रयत्न करण्यात आला’, अशी टीकाही त्यांनी केली.