PF- पीएफचे पैसे काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार

भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नोकरदारांना कामगार मंत्रालयाने दिलासा देणारा निर्णय घेतलाय .  आता यापुढे उमंग या अॅपद्वारे पीएफचे पैसे काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. .. यामुळे तब्बल 4 कोटी सदस्यांना याचा फायदा होणार असून कामगार मंत्रालयाकडून उमंग अॅप लवकरच लाँच केलं जाणार आहे. ईपीएफओला दररोज पीएफचे पैसे काढण्यासाठी, पेंशन संबंधीत किंवा पीडित कर्मचाऱ्यांसंबंधीत इंशुरन्स काढण्यासाठी जवळपास 1 कोटी अर्ज येतात. .. या सर्व अर्जांचं काम कागदोपत्री केलं जातं. .. त्यामुळे ऑनलाईन प्रणालीमुळे नोकरदारांची मोठी समस्या कमी होणार आहे