वाढत्या पेट्रोल डिझेलच्या दरावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार बोलावणार बैठक

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे, ग्राहक त्रस्त असून, केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येतीये. दरम्यान पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तेल कंपन्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व तेल कंपन्यांचे चेअरमन उपस्थित राहणार आहेत.

ग्राहकांना तातडीने दिलासा देण्यासाठीच्या पर्यायांवर या बैठकीत चर्चा होईल. नवी दिल्लीत आज सायंकाळी पाच वाजता ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पेट्रोल डीजेलच्या वाढत्या दराबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलय.

मुंबईत सध्या पेट्रोलचे दर प्रती लीटर 84 रुपये 73 पैसे तर डिझेलचे दर 72 रूपये 36 पैसे झाले आहेत. तर दिल्लीत पेट्रोल 76.87 रुपये तर डिझेल 68 रुपये प्रति लिटर झालं आहेत. या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी आजवरचा सर्वात उच्चांक गाठला आहे.देशात सर्वाधिक महाग पेट्रोल आणि डिझेल महाराष्ट्रात आहे. आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे, ग्राहक त्रस्त असून, केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येतीये. दरम्यान पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तेल कंपन्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व तेल कंपन्यांचे चेअरमन उपस्थित राहणार आहेत.

ग्राहकांना तातडीने दिलासा देण्यासाठीच्या पर्यायांवर या बैठकीत चर्चा होईल. नवी दिल्लीत आज सायंकाळी पाच वाजता ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पेट्रोल डीजेलच्या वाढत्या दराबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलय.

मुंबईत सध्या पेट्रोलचे दर प्रती लीटर 84 रुपये 73 पैसे तर डिझेलचे दर 72 रूपये 36 पैसे झाले आहेत. तर दिल्लीत पेट्रोल 76.87 रुपये तर डिझेल 68 रुपये प्रति लिटर झालं आहेत. या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी आजवरचा सर्वात उच्चांक गाठला आहे.देशात सर्वाधिक महाग पेट्रोल आणि डिझेल महाराष्ट्रात आहे.