पेट्रोल जाणार शंभरी पार …

Congress agitation against petrol-diesel price hike amravati

टीम महाराष्ट्र देशा:केनियास्थित अमेरिका आणि केनिया यांच्या संयुक्त नाविक तळावर रविवारी दहशतवादी हल्ला झाला . अमेरिका आणि इराण मधील तणावाची स्थिती असतानाच अमेरिकेच्या केनियातील लामू प्रांतातील कॅम्प सिम्बा या नाविक तळावर अल कायदाशी निगडीत असलेल्या अल शबाब या दहशतवादी गटाने हल्ला केला . या हल्ल्यात दोन्ही बाजूनी प्रतिस्पर्ध्यांची जबरदस्त हानी केल्याचा दावा केला आहे.

अशांत पश्चिम आशिया आणि आता आफ्रिकेतील हि घटना यामुळे भविष्यात भारतात पेट्रोलचे दर शंभरीकडे जाऊ शकतात असे उर्जा क्षेत्रातील अभ्यासकांचा अंदाज आहे.

अमेरिकेने इराण वर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता लक्षात घेता, जागतिक अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारावर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून आला. शुक्रवारी सकाळच्या सत्रात बाजार उघडला तेव्हा निर्देशांकात 107 अंकांची घट झाली आणि तो 41 हजार 5 शे 19 अंकावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाठी 39 अंकांची घट होऊन, तो 12 हजार 2 शे 43 अंकावर खाली आला.

गेल्या वर्षापासून अमेरिका आणि इराणमध्ये प्रचंड तणाव आहे. अमेरिकेने बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात ईराणच्या लष्कराचे प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी हा मारला गेला आहे. सुलेमानी यांचा ताफा बगदाद विमानतळाकडे जात असताना अमेरिकेने हा हल्ला केला.

या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून हाशेद-अल-शबिबी फोर्सचे उपप्रमुख अबू मेहदी अल मुहांदिसही ठार झाल्याची माहिती आहे. इराकच्या सरकारी वृत्तवाहिनीने, कासिम सुलेमानी ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमेरिकेने इराणवर अनेक निर्बंध आणले आहेत. या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.