हेच का अच्छे दिन? : मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी

टीम महाराष्ट्र देशा- सर्वसामान्यांना सध्या इंधन दरवाढीचा प्रश्न सतावत असून रोज होत असलेली दरवाढ चिंतेचा विषय ठरत आहे. आज आठवड्याच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा इंधन दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. पेट्रोल 11 पैशांनी, तर डिझेल 5 पैशांनी महागलं आहे. यासोबतच मुंबईत पेट्रोलने नव्वदी गाठली आहे. लवकरच पेट्रोलचे दर शंभरी गाठतील अशी भीती सर्वसामान्य व्यक्त करत आहेत.

Loading...

आंतरराष्ट्रीय बाजारापेठेतील इंधनाचे दर, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण याचा एकूण परिणाम हा पेट्रोल आणि डिझेलवर दिसत आहे. पेट्रोल डिझेलचे दर आजही वाढले असून मुंबईत पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. मुंबईत आज पेट्रोलच्या दरात सहा पैशांनी वाढ झाली असून प्रती लीटरसाठी आता ग्राहकांना ९०.०८ रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिझेलचे दर ७८.५८ रुपये प्रती लिटर झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. इंधन दरवाढीमुळे भाजीपाल्यासह अन्य वस्तूंचे दरदेखील वाढण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असल्यानं सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असून मोदींनी स्वप्न दाखवलेले हेच का अच्छे दिन असा सवाल उपस्थित करू लागली आहे .Loading…


Loading…

Loading...