पेट्रोलपंप,उपाहारगृहातील शौचालये सार्वजनिक शौचालये म्हणून घोषित

वेब टीम :बऱ्याच वेळा पेट्रोलपंप तसेच उपाहारगृहातील  शौचालायचा वापर करण्यापासून सर्वसामन्यांना रोखलं जात .मात्र  भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रातील उपाहारगृहे आणि पेट्रोलपंपाच्या ठिकाणी असलेल्या शौचालयांचा वापर आता सर्वसामान्य नागरिकांना  करता येणार आहे . विशेष म्हणजे  ग्राहक नसलेल्या नागरिकांनादेखील शौचालयाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी सार्वजनिक शौचालये म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे प्रसिद्धीपत्रक भिवंडी महापालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

केंद्र शासनाने ’स्वच्छ भारत अभियान’ तसेच महाराष्ट्र शासनाचे ’स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ सन २०१५ पासून सुरू झालेले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाकरिता शौचालय असणे आवश्यक असून शौचालयाचा वापर करणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. ११ सप्टेंबर २०१७ रोजी नगरविकास विभागाने काढलेल्या शासन परिपत्रकानुसार महापालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केलेले आहे.

महापालिका कार्यक्षेत्रातील उपाहारगृहे आणि पेट्रोलपंप मालकांनी त्यांच्या अखत्यारीत असलेली शौचालये नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत. शिवाय मोफत शौचालयाचे बोर्ड आपापल्या पेट्रोलपंप तसेच उपाहारगृहाच्या दर्शनी भागावर लावायचे असून तसे न केल्यास घनकचरा अधिनियम२०१६ तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम१९४९ च्या कलम ३३४ नुसार कारवाई करण्यात येईल, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

You might also like
Comments
Loading...