१३ ऑक्टोबर ला पेट्रोलपंप चालक १ दिवसीय संपावर तर २७ ऑक्टोबर पासून बेमुदत संपाचा इशारा

मुंबई : रोज बदलणाऱ्या दरामुळे ग्राहक आणि डीलर्सचं होनारं नुकसान, पेट्रोल पंप व्यवसायावरील जाचक अटी, ऑईल कंपन्यांची आणि शासनाची मनमानी यामुळे युनायटेड पेट्रोलियम फ्रंट 13 तारखेला 1 दिवसीय संपावर जाणार आहे. या संपात 54 हजार डिलर सहभागी होणार आहेत. त्यामुळे १३ ऑक्टोबर ला देशभरातील 54 हजार पेट्रोल पंपांवर इंधन खरेदी-विक्री बंद असणार आहे.

हा संप करूनही जर येत्या काही दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास 27 ऑक्टोबरपासून देशभरातील पेट्रोल पंप डिलर बेमुदत संपावर जाणार आहेत.

या मागण्यांमुळे डीलर्सचा संप

कबुल केलेले पण न दिलेले डीलर मार्जिन

मार्केटिंग डिसीप्लीन गाईडलाईनमध्ये लावलेल्या प्रमाणाबाहेरील अन्यायकारक पेनल्टीज

राज्यानुसार बदलणारे दर जे की GST मध्ये इंधन आणल्यास स्वस्त आणि समान होतील

4 नोव्हेंबर 2016 चा ऑईल कंपनी बरोबर झालेला पण न पाळलेला करार

रोज बदलणाऱ्या दरामुळे ग्राहक आणि डीलर्सचे होत असलेले नुकसान