निवडणुका संपल्या आणि पेट्रोल दर वाढले

petrol disel rate

टीम महाराष्ट्र देशा – दोन महिन्यापूर्वी पेट्रोल शंभरी पार करणार का ? अशी चिन्हे दिसत होती. पण त्यानंतर जवळपास  दोन महिने पेट्रोलच्या किंमती स्थिर राहिल्या. आज पुन्हा पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल सध्या 75.91 रुपये प्रति लिटर आहे. तर कालच मुंबईत 75.80 रुपये प्रति लिटर असा दर होता.

Loading...

ऑक्टोबरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. महाराष्ट्रात पेट्रोल 93 रुपयांवर गेलं होतं, तर डिझेलही 80 रुपयांवर पोहोचलं होतं. पण त्यानंतर निवडणुकांच्या काळात पेट्रोलचे दर स्थिर राहिले. पण आता पाच राज्यांचा निकाल लागलाय. त्यानंतर आज लगेच पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्याने वाहनचालकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जातंय. त्याबरोबरच ऑक्टोबर महिन्याप्रमाणे दरवाढीची मालिका पुन्हा कायम होणार का, अशी चर्चाही वाहनचालकांच्यामध्ये दिसते आहे.Loading…


Loading…

Loading...