हे घ्या अच्छे दिन ! पेट्रोल गेल्या सहा दिवसांत तब्बल 46 पैशांनी स्वस्त

टीम महाराष्ट्र देशा : पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने सामन्यांच कंबरड मोडले आहे. त्यात घरगुती गॅसच्या किमती सुद्धा वाढल्याने हेच का तुमचे अच्छे दिन अस म्हणण्याची वेळ सामान्य जनतेवर आली आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग सोळा दिवस वाढ केल्यानंतर आता गेल्या सहा दिवसांपासून इंधनाचे दरात कपात करण्यात येत आहे. काही रुपयांमध्ये वाढ झालेल्या पेट्रोलचे दर आता गेल्या सहा दिवसांत तब्बल 46 पैशांनी स्वस्त झाले आहेत.

Loading...

गेल्या सहा दिवसांत पेट्रोलच्या दरात 46 पैशांनी कपात करण्यात आली आहे, तर डिझेलच्या किंमती 34 पैशांनी कमी झाल्या आहेत. आज (सोमवार) दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई येथे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 14-15 पैसे प्रति लिटरने घट झाली आहे. सलग सहाव्या दिवशी पेट्रोलच्या दरात कपात झाली तर सहामधील पाच दिवसांमध्ये डिझेलच्या किंमती कमी झाल्या आहेत.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या आकडेवारीनुसार, सहा दिवसात पेट्रोलचे दर दिल्लीत प्रतिलिटर 47 पैसे, मुंबईत प्रतिलिटर 46 पैसे, कोलकातामध्ये 46 पैसे तर चेन्नईत 49 पैशांनी कमी झाले आहे. डिझेलच्या दरात दिल्ली आणि कोलकातामध्ये 34 पैसे प्रतिलिटर आणि मुंबई आणि चेन्नईमध्ये 36 पैसे प्रति लीटर घट झाली आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...