पेट्रोल 2.21 तर डिझेल 1.79 रुपयांनी महागलं

petrol pump

नोटबंदीमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांना केंद्र सरकारने आज आणखी एक धक्का दिला. पेट्रोल प्रतिलिटर दरात 2.21 तर डिझेल प्रतिलिटर 1.79 रुपयांनी महागलं. गेल्या दोन महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढउतार कायम सुरू आहे. ऑक्टोबरमध्ये पेट्रोल 1.34 आणि डिझेल 2.34 रुपयांनी महागलं होतं. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात दोन वेळा पेट्रोल स्वस्त करण्यात आलं होतं. 30 नोव्हेंबरला पेट्रोल 1.46 आणि डिझेल 1.53 रुपयांनी स्वस्त झालं होतं.

त्यामुळे आधीच सुट्‌ट्यापैशांसाठी वैतागलेल्या सर्वसामान्याचा खिसा कापला जाणार आहे.