पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ, नवे दर मध्यरात्रीपासून लागू होणार

petrol pump

पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून पेट्रोलच्या दरात २.२१ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या भावातही वाढ करण्यात आली आहे. डिझेलच्या भावात १.७९ रूपयाने वाढ करण्यात आली आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होती. नोटाबंदीनंतर पेट्रोलच्या भावात वाढ करण्यात येईल असे बोलले जात होते, त्यानुसार आता ही वाढ झाली आहे.

एक महिन्याआधी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात करण्यात आली होती. त्यावेळी पेट्रोलचे दर प्रतिलीटर १ रुपया ४६ पैशांनी, तर डिझेल प्रतिलीटर १ रुपया ५३ पैशांनी स्वस्त झालं होतं. त्यानंतर पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव वाढण्यात आले होते. पेट्रोलच्या दरात वाढ आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली होती. पेट्रोलचे दर प्रतिलीटर १३ पैशांनी वाढले असून डिझेलच्या किमतीत प्रतिलीटर १२ पैशांनी कपात करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याचा परिणाम भारतातील तेल कंपन्यांवरही झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याने भारतीय तेल कंपन्यांनाही इंधन दर वाढवावे लागले. तर डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला असल्याने ग्राहकांना आणखी झळ सोसावी लागणार आहे.

तेल कंपन्यांची दर वाढवण्याबाबत काल महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीतच दर वाढीबाबतचा निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे.

यापूर्वी 30 नोव्हेंबर रोजी पेट्रोलच्या किंमतीत 13 पैशांनी वाढ करण्यात आली होती. तर डिझेलचे दर 14 पैशांनी स्वस्त करण्यात आले होते.