पेट्रोल, डीजेलवर जीएसटी लागू करावा- पेट्रोलियम मंत्री

देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. महागाईच्या भडक्यात सर्वसामान्य माणूस चांगलाच होरपळून निघत आहे. महागाई वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे पेट्रोल-डीजेलचे वाढते दर. मागील काही दिवसापूर्वी देशाच्या  करप्रणालीमध्ये मोठे बद्दल करण्यात आले. वस्तू व सेवाकर अर्थात जीएसटी लागू करण्यात आला. पण पेट्रोल, डीजेल यांना जीएसटी मधून वगळण्यात आले.

पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्राकडे एक नवीन मागणी केली आहे. पेट्रोल व डीजेलवर जीएसटी लागू करण्यात यावा. जर इतर वस्तू प्रमाणे पेट्रोल,डीजेलवर वस्तू सेवाकर लागू झाला तर पेट्रोल डीजेलच्या किमंती निम्याने कमी होतील या बरोबर देशात सगळीकडे समान किमंती असतील. धर्मेंद्र प्रधान म्हणाले देशात समान कर प्रणाली लागू करण्यात आली आहे, यामध्ये पेट्रोल-डीजेलचा देखील समावेश करण्यात यावा. याकरता अर्थ मंत्रालयाला निवेदन पाठविण्यात आले आहे.अर्थमंत्रालयातून परवागी मिळाली तर नक्कीच पेट्रोल डीजेलच्या भावात फरक पडेल.

You might also like
Comments
Loading...