पेट्रोल – डिझेल भडकले, सलग सातव्या दिवशी बेसुमार भाव वाढ

PETROL

टीम महाराष्ट्र देशा : सौदी येथे खनिज तेलाच्या रिफायनरीवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यामुळे जागतिक स्तरावर खनिज तेलाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे याचा फटका भारतालाही बसत आहे. कारण गेल्या 7 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. सतत सातव्या दिवशी पेट्रोलच्या किमतीत वाढ झाल्याने. देशाच्या अनेक भागांमध्ये पेट्रोल प्रति लिटर 80 रुपयांवर जाऊन पोहचले आहे. तर डिझेलची किंमतही प्रति लिटर 70 रुपये एवढी झाली आहे.

सोमवारी सलग सातव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. यामुळे देशाच्या राजधानीत पेट्रोल 1.88 रुपये प्रतिलिटर महागले आहे, तर डिझेलच्या दरातही लिटरमागे 1.50 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे देशातील इतर शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत वाढली आहे. आखाती प्रदेशात सुरू असलेल्या तणावामुळे आणि अमेरिका-चीन ट्रेडवॉरमुळे तेलाच्या किंमती सातत्याने वाढत आहेत.

दिल्लीत पेट्रोलचे दर 29 पैसे, कोलकाता आणि मुंबईमध्ये 28 पैसे, तर चेन्नईमध्ये 31 पैसे प्रतिलिटर वाढले आहेत. दिल्लीत डिझेलच्या दरात 19 पैसे आणि चेन्नईमध्ये 20 पैसे आणि मुंबईत 21 पैशांची वाढ झाली आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई मधील पेट्रोलचे दर अनुक्रमे 73.91रुपये, 76.60 रुपये, 79.57 रुपये आणि 76.83 रुपये प्रति लीटरने महागले आहे.