पाच राज्यांमधील निवडणूका संपल्यानंतर पुन्हा वाढू लागले पेट्रोल-डिझेलचे दर

narendra modi

नवी दिल्ली- पाच राज्यांमधील निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर मोदी सरकारने अपेक्षेप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. 18 दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहिल्यानंतर आज पुन्हा त्यात वाढ झाल्याने सामान्यांना पुन्हा एकदा झटका बसला आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत 15 ते 20 पैसे प्रति लीटर अशी वाढ केली आहे. पेट्रोलच्या किंमतीत  झालेल्या वाढीनंतर मुंबईतील दर प्रति लीटर 96.95 रुपये झाला आहे. तर मुंबईत डिझेलचा भाव  87.98 रुपये प्रति लीटर आहे.

एप्रिलमध्ये आणि मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तीन वेळा कमी करण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल अजूनही प्रति बॅरल 66 डॉलरच्या वर आहे.

कच्चे तेल कित्येक आठवड्यांपासून कमतरता दर्शवित आहे. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 71 डॉलर वरून कमी होऊन 63 डॉलर प्रति बॅरलवर गेली. पण आता ती वेगात परतत आहे.

महत्त्वाच्या बातम्या