पेट्रोल-डिझेल ‘जीएसटी’ कक्षेबाहेरच, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण

nirmla sitharaman

नवी-दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वात जीएसटी काऊन्सिलची ४५ वी बैठक १७ सप्टें.ला लखनऊमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्या संबंधी विचार विनिमय करण्यात येणार होता. दरम्यान, पेट्रोल-डिझेलला सध्या तरी वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणणार नसल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे.

१८ महिन्यांनंतर जीएसटी परिषदेची ही प्रत्यक्ष बैठक झाली. सध्याच्या काळात पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणणे शक्य नाही, यावर परिषदेतील सर्वच सदस्यांचे एकमत झाले. यासंदर्भात स्पष्टीकरण देत सीतारामन म्हणाल्या की, ‘न्यायालयाच्या निर्देशामुळे हा विषय विचारार्थ घेतला गेला आणि सदस्यांनी स्पष्टपणे पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यास ठाम विरोध दर्शविला.’ तसेच केरळ उच्च न्यायालयालाही हा निर्णय कळविला जाईल, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले नव्हते. परंतु आता आंतरराष्ट्रीय पातळीवर दरवाढ झाल्याने ते पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या