पेट्रोल -डिझेलचा पुन्हा भडका! जाणून घ्या नवे दर

मुंबई: देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. महागाईच्या भडक्यात सर्वसामान्य माणूस चांगलाच होरपळून निघत आहे. महागाई वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे पेट्रोल -डिझेलचे वाढते दर. आज पुन्हा एकदा पेट्रोल 34 तर डिझेलच्य प्रतिलीटर दरात 37 पैशांनी वाढ झाली आहे. सततच्या होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त हा

गेल्या दोन दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर होते. त्यामुळे इंधनाच्या दरवाढीला लगाम बसेल, अशी आशा होती. मात्र, आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने सामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असून उत्पादन मात्र कमी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ओपेक देशांची बैठक पार पडली, त्यामध्ये दररोज केवळ 4 लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे कच्च्या तेल्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या NYME क्रूडचा दर 78.17 डॉलर्स प्रतिबॅरल इतका झाला आहे. गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर असुन, ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल 81 डॉलर्स आहे.

आज जारी केलेल्या दरानुसार, मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 110.75 रुपये तर डिझेल 101.40 रुपये प्रती लीटरपर्यंत पोहचले आहे. दिल्लीत पेट्रोल 104.78 आणि डिझेल 93.54 रुपये दर इतका आहे. इंधनाचे दर सर्वाधिक मुंबईत असून काही दिवसातच हे दर 120 रुपये प्रती लीटर होईल यात काही शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या