‘मोफत लस दिली म्हणून पेट्रोल, डिझेल महागलं’; केंद्रीय मंत्र्यांचे अनोखं विधान

नवी दिल्ली : वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. दिवसागणिक पेट्रोलचे गगनाला भिडणारे भाव प्रत्येकालाच अस्वस्थ करणारे आहेत. मात्र पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवरून केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी एक अजब वक्त्यव्य केले आहे.

केंद्र सरकारने देशभरातील कोट्यवधी नागरिकांना मोफत कोरोना लस दिली. त्यामुळेच देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या असल्याचे विधान रामेश्वर तेली यांनी केल्याने एकच चर्चा रंगली आहे. हिमालयातील एक लिटर पाणी एक लिटर पेट्रोलपेक्षाही महाग आहे, असेही तेली म्हणाले.

पेट्रोल, डिझेल महाग नाही, केंद्र आणि राज्यांनी त्यावर कर लावला आहे. त्यातच नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस केंद्राने मोफत दिली आहे. मग त्या लसींसाठी पैसे कुठून येणार? तुम्ही लसीसाठी पैसे दिले नाहीत. त्यामुळे करांमधून लसींची किंमत वसूल करण्यात आली आहे. केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री तेली यांनी असे विधान केल्याने खळबळ उडाली आहे.

वाढत्या महागाईमुळे आधीच सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना, तेली यांच्या अशा वक्त्यव्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान, वाढत्या किमतीमुळे दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 104.44 रुपये प्रति लिटर तमुले र डिझेल 93.17 रुपयांवर स्थिर आहे. मुंबईत 110.41 रुपये प्रति लिटरच्या सर्वोच्च स्तरांवर आहे. तसेच मुंबईत डिझेल आता 101.03 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. तर आज 12 ऑक्टोबर रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

महत्वाच्या बातम्या