पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला

PETROL

मुंबई: राज्यासह देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर केंद्र सरकारने नियंत्रणमुक्त केले आहेत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा आढावा घेतात.

नागपूरमध्येही पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. मुंबईत लीटरमागे पेट्रोलचे दर ८१ रुपयांवर पोहोचले असून, डिझेल प्रती लीटर ६८ रुपयांवर पोहोचले आहे. १८ पैशांनी पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आल्याची माहिती पेट्रोलियम कंपन्यांनी दिली आहे. गेल्या वर्षभरात पेट्रोलच्या दरात ९ रुपये तर डिझेलच्या दरात ७ रुपयांनी वाढ झाली आहे.Loading…
Loading...