पेट्रोलमुळे सामन्यांचे वाजले कि बारा; सलग बाराव्या दिवशी पेट्रोलचे भाव वाढले

petrolpump

टीम महाराष्ट्र देशा: एका बाजूला राज्यामध्ये उन्हाच्या पारा काहीसा खाली आला असताना, दुसरीकडे पेट्रोलदराचा पारा मात्र वाढतच आहे . कर्नाटक निवडणुकीनंतर सुरु झालेली पेट्रोल-डिझेल दरातील वाढ लागोपाठ १२ दिवसांपासून सुरूच आहे. आज पेट्रोलचे दर 36 पैशांनी तर डिझेलचे दर 22 पैशांनी वाढले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 85 रुपये 65 पैसे तर डिझेल 73 रुपये 20 पैसांवर पोहचले आहे.

पेट्रोलचे भाव वाढल्याने सरकारला देशभरातून रोषाला सामोर जाव लागत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये पेट्रोल-डिझेल सर्वाधिक महाग आहे. त्यामुळे वाढलेल्या दरांची सर्वाधिक झळ राज्यातील नागरिकांना बसत आहे. दरम्यान, हे दर कमी करण्यासाठी केंद्राकडून राज्यांशी चर्चा केली जात आहे. इंधनावरील व्हॅट कमी करण्यासाठी मोदी सरकारकडून राज्यांना विचारणा केली जात आहे.