कर्नाटक मतदान होताच पेट्रोलच्या भावाने गाठला उच्चांक

petrol pump

टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटक निवडणुकीचे मतदान संपन्न होताच देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या भावाने नवा उच्चांक गाठला आहे. निवडणुकी दरम्यान १९ दिवस पेट्रोलचे दर स्थिर होते. मात्र, आता पेट्रोलच्या दरांमध्ये प्रति लिटर 17 पैसे, तर डिझेलच्या दरांमध्ये 21 पैसे वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इंधनाचे भाव वाढल्यानं पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्याच सांगण्यात येत आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढीनंतर आता दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 74.80 प्रति लिटर, तर डिझेल 66.14 रुपये प्रति लिटरवर झाले आहे.