न्या. लोया प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर फेरविचार याचिका

नवी दिल्ली : सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात सुनावणी करणारे विशेष सीबीआय न्यायाधीश बी.एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने लोयाप्रकरणाला पूर्णविराम मिळाला होता.

मात्र आता लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्याची मागण फेटाळण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे. बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयाच्या १९ एप्रिल रोजीच्या निकालास आव्हान दिले आहे.

न्या.लोया यांचा १ डिसेंबर २०१४ रोजी मृत्यू झाला होता, सहकारी न्यायाधीशाच्या मुलीच्या लग्नासाठी ते नागपूरला गेले असताना तेथे ही घटना घडली. न्या. लोया यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला असे जाहीर करण्यात आले होते.